Pimpri: कोरोना काळातील पालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात उद्या आंदोलन

Tomorrow's agitation against the sloppy administration of the Corona era : कोरोना बेडची वस्तुनिष्ठ व खरी माहिती मिळावी या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सांगितले.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासन कोरोनाच्या काळात ढिसाळ काम करत आहे.  ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटरची डॅशबोर्डवर  अद्ययावत माहिती दिली जात नाही. खासगी रुग्णालयातील ऑक्सीजन बेड व्हेंटिलेटरची डॅशबोर्डवर टाकलेली माहिती व प्रत्यक्षातील वस्तुस्थिती यामध्ये प्रचंड तफावत असते. यामध्ये सुधारणा करावी. वस्तुनिष्ठ व खरी माहिती मिळावी या मागणीसाठी उद्या पालिका मुख्यालयात जन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दिली.

पिंपरी-चिंचवडच्या पालिका रुग्णालयात ऑक्सीजन बेड, सिलेंडर, व्हेंटिलेटर्स, आयसीयूची क्षमता वाढविणे आवश्यक आहे.  शहरात कोविड 19च्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

आज शहरात बारा हजारापेक्षा अधिक रुग्ण संक्रमित आढळले आहेत. रोज पाचशे ते सहाशे संक्रमित रुग्ण आढळत आहेत. आज शहरात तीन हजारपेक्षा अधिक संक्रमित रुग्ण आहेत. तर, आजपर्यंत 286 रूग्णांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील खासगी रुग्णालयात ऑक्सीजन बेड मिळत नाही. पालिका व डी. वाय. पाटील रुग्णालयातही ऑक्सीजन बेड कमी पडतात. पालिका अथवा खासगी हॉस्पिटल प्रशासनाकडे रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड अथवा व्हेंटिलेटर आहेत का, असे विचारले असता ते नाही म्हणून सांगतात‌.

याबाबत पालिकेच्या जबाबदार लोकांना फोन लावले असता ते फोन घेत नाहीत. जर एखाद्या जबाबदार अधिका-याने फोन घेतला. तर, ते ती जबाबदारी दुसर्‍यावर ढकलतात. त्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

पालिका ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटरची माहिती  पालिकेच्या डॅशबोर्डवर टाकली जाते. पालिकेने खासगी रुग्णालयाच्या व पालिका रुग्णालयाच्या ऑक्सीजन बेड व्हेंटिलेटरची डॅशबोर्डवर टाकलेली माहिती व प्रत्यक्षातील वस्तुस्थिती यामध्ये प्रचंड तफावत असते.

खासगी रुग्णालयातची माहिती सपशेल खोटीच असते. त्यामुळे पालिकेने ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर आयसीयूची क्षमता वाढावावी. तसेच डॅशबोर्ड वरील माहिती वस्तुनिष्ठ व खरी मिळावी या प्रमुख मागणीसाठी आम्ही उद्या  महापालिका मुख्यालयात सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून जन आंदोलन करणार आहोत, असे भापकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1