Pimpri : बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आज खराब नोटा बदलून मिळणार

एमपीसी न्यूज- सध्या चलनात असलेल्या कापलेल्या, मळलेल्या, खराब नोटा व नाणी बदलून देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजीराव रस्ता आणि पिंपरी शाखेमध्ये एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुक्रवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत नागरिकांना निःशुल्क नोटा बदलून मिळणार आहेत.

या मेळाव्याला बँक ऑफ महाराष्ट्र आणि रिझर्व्ह बँकेचे अधिकारी उपस्थित राहणार असून नागरिकांनी या दोन्ही शाखेमध्ये जाऊन खराब नोटा बदलून घ्याव्यात असे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.