Pimpri : टोईंग व्हॅन उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षाकाठी पालिकेला मिळाले 96 लाख रुपये

एमपीसी न्यूज – मार्च 2022 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड वाहतूक (Pimpri)पोलिसांकडून टोईंग व्हॅन द्वारे कारवाईला सुरुवात झाली. यामध्ये नो पार्किंग मध्ये पार्क केलेली वाहने टो केली जातात. या उपक्रमाची मार्च 2023 मध्ये वर्षपूर्ती झाली. या एका वर्षभरात या उपक्रमातून कारवाईपोटी महापालिकेच्या तिजोरी 96 लाख 28 हजार 800 रुपये जमा झाले आहेत.
वाहन चालकांना शिस्त लागावी, पे अँड पार्कच्या माध्यमातून महापालिकेला उत्पन्न मिळावे; यासाठी टोईंग व्हॅन द्वारे कारवाईला सुरुवात करण्यात आली. ही कारवाई वाहतूक पोलिसांकडून केली जाते. यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांना सात टेम्पो आणि एक क्रेन उपलब्ध करून दिले. प्रत्येक कारवाई मधून दुचाकीस्वारांकडून 200 रुपये टोईंग चार्जेस, 500 रुपये नो पार्किंग चार्जेस आणि जीएसटीचे 36 रुपये असे एकूण 736 रुपये घेतले जातात.

 

Talegaon Dabhade : आंबी गावातील इंद्रायणी नदीवरील पूल बनला धोकादायक

एका वर्षात महापालिकेला या कारवाई मधून 96 लाख 28 हजार 800 रुपये मिळाले आहेत. त्यातील 46 लाख 8 हजार रुपये टोईंग व्हॅनचे भाडे देण्यात आले आहे. वाहन चालकांनी पे अँड पार्क वाहने पार्क करावीत, हा या कारवाईमागील महापालिकेचा मुख्य हेतू होता. वाहन उचलण्यापूर्वी मेगाफोनद्वारे संबंधित वाहनाचा नंबर पुकारला जातो. मात्र वाहन चालक तिथे न आल्यास संबंधित दुचाकी वाहन उचलून टेम्पोत टाकून वाहतूक शाखेत नेले जाते.

वाहतूक पोलिसांवर वाहन चालकांचा आरोप
टोईंग व्हॅन सोबत वाहतूक पोलीस असतात. नो पार्किंग मधील वाहन टो करताना वाहतूक पोलीस संबंधित वाहनाचा क्रमांक पुकारत नाहीत. तसेच वाहन टो केल्यानंतर वाहनाच्या ठिकाणी विशिष्ट चिन्ह ठेवत नाहीत. त्यामुळे आपले वाहन टो केले आहे की चोरून नेले आहे, याची खात्री वाहन चालकांना करता येत नसल्याचे वाहन चालक सांगतात.
क्रेनची संख्या वाढविण्याची गरज
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील दहा वाहतूक विभागांमध्ये (Pimpri) त्यातही महापालिकेने ज्या ठिकाणी पे अँड पार्क केले आहे, अशाच भागात कारवाई केली जाते. दुचाकी वाहनांच्या कारवाईसाठी मुबलक व्हॅन आहेत. मात्र चारचाकी वाहनांवर कारवाईसाठी एकच क्रेन आहे. त्यामुळे क्रेनची संख्या वाढविण्याची गरज अधोरेखित केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.