Pimpri: वाहतूक, घनकचऱ्याबाबत आरएसएसतर्फे जनजागृती

एमपीसी न्यूज – वाहतूक, घनकच-याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शासन यंत्रणा व पिंपरी-चिंचवड शहर विकास मंचच्या माध्यमातून संघ कार्यकर्ते यांनी रविवारी (दि. 2)शहराच्या विविध भागांत वाहतूक नियमन करून अनोखे सामाजिक रक्षा बंधन साजरे केले.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसें-दिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनत चालला आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वाहतूक व घन कचरा विषयावर समाजाचे जागरण, प्रबोधन व समस्या निर्मूलनाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी शासन यंत्रणेच्या मदतीने, पिंपरी-चिंचवड शहर विकास मंचच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे 300 स्वयंसेवकांनी शहरातील आकुर्डी, चिंचवड, देहू, सांगवी, निगडी, पिंपरी, रावेत, वाकड, भोसरी, काळेवाडी यासह विविध भागातील प्रमुख चौकात वाहतूक नियमन करून नागरिकांना त्यासंबंधीची माहिती संदेश पत्रकाचे वाटप, फलकांद्वारे जनजागृती केली.

या उपक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाबरोबरच डी. वाय. पाटील अभियांत्रिकी, आकुर्डी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.