Pimpri : वाहतुकीसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – वाहतूक नियमांची माहिती मोठय़ांनाही दिली जात असली तरी ती शाळास्तरावर निरंतर दिली जावी, असा मतप्रवाह जोर धरू लागला असून तसे केल्यास तो पुढील आयुष्यात खऱ्या अर्थाने सुजान नागरिक घडतील, असे रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या अध्यक्षा वैजयंती आचार्या यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण, बिझी बीज प्री स्कूल, इंटरअॅक्ट क्लब ऑफ मॉडर्न हायस्कूल यमुनानगर यांच्या संयुक्त विद्यमाने हे वाहतूक जनजागृती अभियान निगडीतील भेळ चौक येथे नुकतेच राबविण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या अध्यक्षा वैजयंती आचार्या, बिझी बिज प्री स्कूलच्या दिपा जावडेकर, युथ डायरेक्टर कुलदिप मोकाशी आणि इंटरअॅक्ट क्लब ऑफ मॉडर्न हायस्कूलचे स्काऊट गाईडचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

  • यावेळी त्या पुढे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना शाळेतच वाहतूक नियमांचे धडे देण्यासाठी ‘आरएसपी’ योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्याची गरज आहे. हे शिक्षण देणा-या शाळांची संख्या वाढवण्याची गरज असून शाळांनीही त्यासाठी स्वत:हून पुढे आले पाहिजे. शिक्षण संस्था पुढे येत नाही, असे म्हणत हातावर हात ठेवत न बसता पोलिसांनीही पुढे येण्याची गरज आहेच. वाहतूक नियमनासाठी आरएसपी विद्यार्थ्यांची मदत घेता येऊ शकते. मात्र, विद्यार्थी असल्याने त्यांच्यावर कामाचा बोझा पडता कामा नये, याचीही काळजी घेतली गेली पाहिजे. शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी या बाबत स्वतंत्र वाहतूक रस्ता सुरक्षा तसेच नियम हा विषय असणे काळाची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.