Pimpri : वायसीएमएच समोरील वाहतूक कोंडीचा नागरिक, रुग्णांना त्रास

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती वायसीएम रुग्णालयासमोर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकून नागरिकांसह रुग्णांना त्रास होत आहे. तसेच यामुळे परिसरात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत आहे.

वायसीएम रुग्णालयाशेजारी वैद्यकीय महाविद्यालय, रहिवासी इमारती, दुकाने आहेत. परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात हातगाड्या लागलेल्या असतात. तसेच रस्त्यावर होणाऱ्या पार्किंगमुळे वाहतुकीसाठी रस्ता अरुंद होतो. या अरुंद झालेल्या रस्त्यावरून पीएमपीची एखादी बस आल्यास तिला वळण्याइतकी देखील जागा उरत नाही. यामुळे वाहतूक कोंडी होते. परिणामी प्रदूषण होते.

रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रस्त्यावर रिक्षा पार्क केल्या जातात. तसेच दुपारच्या आणि सायंकाळच्या वेळी कॉलेज सुटल्यानंतर रस्त्यावर मोठी गर्दी होते. या गर्दीतून वाट काढण्यासाठी रुग्णवाहिका यांना मोठी कसरत करावी लागते. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी  वायसीएम रुग्णालयासमोर वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे गरजेचे आहे. रस्त्यावरील बेकायदेशीर हातगाड्या, पार्क केलेली वाहने हटविल्यास वाहतुकीसाठी रस्ता मोकळा होईल, असे स्थानिक नागरिक सांगतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.