Pimpri : काेट्यवधी खर्चूनही वृक्षगणना अहवाल प्रसिध्द नाही; माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड शहरात 2017 मध्ये (Pimpri )काेट्यवधी रूपये खर्चून वृक्षगणना करण्यात आली. मात्र, त्याचा अहवाल अद्याप प्रसिध्द झाला नाही.

तसेच पालिकेच्या उद्यान विभागात 50 टक्के पदे रिक्त आहेत, यासह शहरातील पर्यावरणासंदर्भात माजी पर्यावरण मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वृक्षप्राधिकरणाचे माजी सदस्य सुरेश वाडकर यांनी दिले.

Alandi : जल प्रदूषणाच्या समस्येचे गांभीर्य प्रशासनाने लक्षात घ्यावे – इंद्रायणी सेवा फाउंडेशन
त्या निवेदनात म्हटले आहे की, आपण पर्यावरण मंत्री (Pimpri )असताना महाराष्ट्र (नागरिक क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जन सुधारणा अधिनियम प्रभावीपणे अंमलात आणला. याबद्दल आपले अभिनंदन. मात्र, या अधिनियमात काही सुधारणा आवश्यक आहेत.

शहरातील पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षसंवर्धन कामकाजासाठी उद्यान-वृक्षसंवर्धन विभाग आहे. या विभागातील 50 टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे उद्यान विभागाच्या कामाला गती येत नाही, याकडेही आपण लक्ष घालावे.

सुधारीत बांधकाम नियमावलीत उभ्या इमारतीसाठी संकल्पना 3 अंमलात आली आहे. त्यामध्ये साईड मार्जिनमध्ये वृक्षरोपणासाठी जागा सोडण्याची तरतूद केलेली नाही. वास्तविकता मोठ्या इमारतीच्या चारही बाजूंनी वृक्षारोपण आवश्यक आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.