Pimpri : मुळा नदी काठच्या वृक्षांची वृक्षप्रेमी रविवारी करणार गणना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri) वतीने मुळा नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येत असून त्यात 1 हजारपैकी 350 झाडे बाधित होत असल्याचा दावा केला आहे. मात्र, गुगलवर जास्त झाडे दाखवत असल्याचा दावा करत शहरातील वृक्षप्रेमी नागरिक उद्या (रविवार) मुळा नदी काठी सकाळी 6 ते 10 या चार तासात झाडांची संख्या आणि कोणत्या जातीचे झाडे यांची सर्व माहिती घेणार आहेत.

पिंपरी महापालिका मुळा नदीच्या एका बाजूने प्रकल्प राबवत आहे. वाकड बायपास ते स्पायसर कॉलेज-सांगवी पूल असे 8.80 किलोमीटर अंतराच्या या कामासाठी 276 कोटी 54 लाख खर्च होणार आहे. हे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. या काठावर अनेक जुनी दुर्मिळ झाडे व वनस्पती आहेत. 2018 ला झालेल्या वृक्षगणनेत या काठावर विविध जातीचे एकूण 1 हजार लहान व मोठी झाडे आहेत. त्यातील सुमारे 300 झाडे ही विदेशी आहेत. ती काढून देशी जातीचे झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच, कामास बाधित होणारे सुमारे 350 झाडे काढून त्याचे काठावरच इतरत्र पुनर्रोपण करण्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

Maharashtra : 28 मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार नव्या संसदेचे उद्घाटन; स्वातंत्र्यवीर सावकरांचा अनोखा सन्मान?

याबाबत वृक्षप्रेमी प्रशांत राऊळ म्हणाले, मुळा नदी सुधार प्रकल्प (Pimpri) सुरू होणार आहे. त्यासाठी हजारो झाडे तोडली जाणार आहेत. ही झाडे कोणती आहेत किती आहेत याची माहिती पालिकेकडे मागितली, ती आत्तापर्यंत मिळाली नाही. पालिका फक्त 350 झाडे बाधित होत असल्याचा दावा करत आहे. या आकडेवारीत तथ्य नाही. त्यामुळे रविवारी शहरातील वृक्षप्रेमी आणि वृक्षांची माहिती असलेले तज्ञ चार तास झाडांची संख्या, कोणत्या जातीचे झाडे यांची सर्व माहिती घेणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.