Pimpri : ट्रेकींग पलटण’ने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तुंग गडावर राबविली स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज – ट्रेकिंग पलटण ग्रुप पुणेच्या सदस्यांनी नववर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले. जिथे लोक मित्रपरिवारासोबत नववर्षाचे स्वागत तसेच जल्लोष करण्यात मग्न असतात. तिथे ट्रेकींग पलटण ग्रुपच्या ३६ व्या मोहिमेअंतर्गत, बुधवारी (दि. १ जानेवारी २०२०) पहाटे तुंग गडावरील तसेच गडवाटेवरील प्लॅस्टिक गोळा करून गडस्वच्छतेचा निर्धार दृढ केला. २०२० वर्षाच्या पहिल्या सूर्योदयाच्या साक्षीने नववर्षाचे स्वागत केले.

ट्रेकींग पलटण ग्रुपने उल्लेखनीय बाब म्हणजे २०१९ वर्षाला निरोप देतांना कर्नाळा गडावर स्वच्छता करून दिला होता. २०१६ मध्ये गड प्लॅस्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या ग्रुपची ही ३६ वी मोहीम होती.

तुंग गडाच्या या प्लॅस्टिकमुक्त मोहिमेत प्रथम पाटील, प्रदीप पाटील, संदीप चौधरी, कुमार खुंटे, नितीन बागले, अमोल गोरे, सचिन बारापात्रे, आनंदा पवार (वय ६०) आणि डॉ. सुरेश इसावे यांनी सहभाग घेतला. या मोहिमेचे नियोजन प्रा डॉ सुरेश इसावे यांनी केले. डॉ संदीप गाडेकर यांची मदत लाभली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.