Pimpri: स्थायी समिती सभेत नगरसेवक दत्ता साने यांना श्रद्धांजली

Tribute to corporator Datta Sane at the standing committee meeting : स्थायी समिती सभा शुक्रवारपर्यंत तहकूब

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दिवंगत दत्ता साने यांना श्रद्धांजली वाहून पालिकेची स्थायी समिती सभा शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली. साने यांचे कोरोनामुळे 4 जुलै रोजी निधन झाले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.

विद्यमान नगरसदस्य व माजी विरोधी पक्षनेते दिवंगत दत्तात्रय साने, माजी नगरसदस्य विठोबा लांडे, संजय साळवी तसेच माजी नगरसदस्य वसंतराव लोंढे यांचे चिरंजीव महेश लोंढे यांचे निधन झाले आहे.

त्यांना या सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवगंत मान्यवरांना श्रद्धांजली वाहून शुक्रवार (दि.10) जुलै पर्यंत सभा तहकूब करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.