_MPC_DIR_MPU_III

Pimpri: दत्ता साने यांना व्यंगचित्रातून श्रध्दांजली

Tribute to Datta Sane through caricature शहरातील व्यंगचित्रकार गणेश भालेराव यांनी साने यांच्यावर व्यंगचित्र काढत त्यांच्या भावनांना वाट करून दिली आहे.

एमपीसी न्यूज – गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक दत्ता साने यांचे आज कोरोनामुळे सकाळी निधन झाले. शहरातील व्यंगचित्रकार गणेश भालेराव यांनी साने यांच्यावर व्यंगचित्र काढत त्यांच्या भावनांना वाट करून दिली आहे. सध्या त्यांच्यावर काढलेले व्यंगचित्र सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहे.

वारकरी सांप्रदायाचा वारसा जपणारे दत्ता साने यांनी विठूरायाला मिठी मारलेली व्यंगचित्रात दाखवले आहे.  तर  “तुका म्हणे एक मरणाचि सरे । उत्तमचि उरे किर्ती मागे ॥” या जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आधार घेत अत्यंत भावनिक व्यंगचित्र रेखाटत साने यांना श्रध्दांजली वाहीली आहे.

साने हे वारकरी सांप्रदायाचा वारसा जपणारे अत्यंत मनमिळावू व्यक्तिमत्व होते. दरवर्षी त्यांचा पालखीमध्ये सहभाग असायचा.वारकऱ्यांना  ते विवीध माध्यमातून सहाय्य करायचे. तसेच किर्तन सोहळ्याचे आयोजन ते करीत असत. पिंपरी- चिंचवड शहरात उभे रहात असलेल्या संतपीठाच्या निर्मीतीसाठी साने यांचा महत्वपुर्ण पाठपुरावा होता. साने यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायातून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.