Pimpri: पालिकेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Tribute to Lokshahir Annabhau Sathe on behalf of the municipality

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त पालिका मुख्य प्रशासकिय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती अध्यक्ष दत्तू चव्हाण, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे खजिनदार वसंत वावरे, सामाजिक कार्यकर्ते सुनिल भिसे, गणेश खंडाळे, संजय ससाणे, नितिन घोलप, अरुण जोगदंड आदी उपस्थित होते.

निगडी येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले,  सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, मनोज तोरडमल, सतिश भवाळ, सुनिल भिसे, संजय ससाणे, नितिन घोलप, अरुण जोगदंड, दशरथ कसबे, कैलास पाटोळे, विकास भवाळ आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.