Nigdi : त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमीत्त अभिवादन

एमपीसी न्यूज – भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड कमिटीच्या वतीने (Nigdi) त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमीत्त आज निगडी येथील राजरत्न बुध्द विहार या ठिकाणी अभिवादन करण्यात आले. यावेळी भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष सुरज गायकवाड यांच्या हस्ते माता रमाई यांना पुष्पहार घालुन अभिवादन केले.

Chinchwad : मार्केटिंग क्षेत्र करिअर संधीसाठी उत्तम क्षेत्र – श्रीरंग दामले

यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे नेते रजनीकांत क्ष्रिरसागर, भीमशक्तीचे नेते गौतम गायकवाड, लढा युथ मुव्हमेंटचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर, निगडी परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवपुत्र निंबाळकर, पंचशील भजनी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, राजरत्न बुध्द विहाराचे संस्थापक शिवशरण हिप्परगीकर, अशोक संगोळकर,

भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष परमेश्वर निसरगंध, पिंपरी चिंचवड संघटक विशाल भाऊ केंगार, भीमशक्ती निगडी शाखा अध्यक्ष रवि अल्लापुर, धीरजकुमार मगी, लहू साळुंखे, अमोल शिनगारे, निगडी मधील ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र गायकवाड, मरीआप्पा भंडारे आदी कार्यकर्ते तसेच विद्यार्थी उपस्थित (Nigdi)  होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.