Pimpri: नुकसान भरपाईसाठी ट्रकचालकासह क्लिनरला मारहाण करत लुबाडले

एमपीसी न्यूज – डाव्या बाजूने ट्रकला ओव्हरटेक करताना मोटार ट्रकला घासली असता नुकसान भरपाई देण्याची मागणी करत मोटारचालकाससह त्याच्या साथीदाराने ट्रकचालक आणि क्लिनरला मारहाण केली. तसेच ट्रकचालकाच्या खिशातील तीन हजारांची रोकड लुबाडून नेली. ही घटना मोरवाडी येथे घडली.

संजू मुकुंदराव जाधव (वय 45, रा. निरगुडी, बसवकल्याण, कर्नाटक) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मोटारचालकासह (एमएच 12, ईएफ 5189) त्याच्या साथीदाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाधव हे क्लिनर पांडुरंग पवार यांच्यासह ट्रक घेऊन जात होते. मोरवाडी येथे फिनोलेक्स चौकात मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मोटारचालकाने ट्रकच्या डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकला मध्यभागी मोटार घासली. मोटारीचे नुकसान झाले म्हणून मोटारचालकाने जाधव यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली. जाधव यांनी नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शविली. तरीही मोटारचालक आणि त्याच्या साथीदाराने जाधव आणि पवार यांना मारहाण केली. तसेच जाधव यांच्या खिशातील तीन हजारांची रोकड आणि ट्रकची कागदपत्रे काढून पोबारा केला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.