Pimpri : अनागोंदीच्या काळात तुकाराम महाराजांनी समाजाला अचूक मार्गदर्शन केले- अॅड सतीश गोरडे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात अनागोंदी असताना समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी केले, असे उद्गार जनसेवा सहकारी बॅकेचे माजी अध्यक्ष अॅड सतीश गोरडे यांनी काढले.
 श्रीसंत तुकाराम महाराज प्रतिष्ठान व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने संततुकारामनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या तुकाराम बीज व शिवजयंती सोहळा या कार्यक्रमाचे उद्घाटन  अॅड सतीश गोरडे याचे हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी श्रीसंत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू कदम, ज्येष्ठ गायिका माधुरी आंबेकर, सामाजिक कार्यकर्ते माणिकराव अहिरराव, सुभाष कोळी, सतीश काळे, हरिभाऊ करमाळकर, राजू जावळे, वंदना शेवडे जोशी आदी उपस्थित होते.
जगद्गुरु तुकाराम महाराज हे लोककवी होते, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा, असे अभंग जनसामान्यांना सांगून ईश्वरभक्तीचा सुगम मार्ग दाखविणारे  संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे युगप्रवर्तक  होते, असेही अॅड सतीश गोरडे म्हणाले.
उद्घाटनानंतर माधुरी आंबेकर यांच्या विद्यार्थिनींनी भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम सादर केला. सूत्रसंचालन रेवती सौधींकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.