Pimpri : पिंपरीच्या उपमहापौरपदी भाजपचे तुषार हिंगे बिनविरोध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या उपमहापौरपदी मोरवाडीचे प्रतिनिधीत्व करणारे भाजपचे तुषार हिंगे यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू बनसोडे यांनी माघार घेतली. त्यामुळे हिंगे यांची बिनविरोध निवड झाली.

पीठासीन अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांनी कामकाज पाहिले. दुपारी बारा वाजता निवडणुकीला सुरूवात झाली. माघारीसाठी 15 मिनिटांचा वेळ दिला. या मुदतीत बनसोडे यांनी माघार घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.