Pimpri : महिलेला मारहाण केल्याप्रकरणी पतीसह बारा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिला एका मुलाच्या गाडीवरून फिरत असल्याच्या संशयावरून तिच्या घरच्यांनी तिला मारहाण केली. याप्रकरणी महिलेने आई, पती आणि भाऊ-बहिणींसह बारा जणांवर गुन्हा नोंदवला आहे. ही घटना 15 जुलै रोजी पिंपरी येथे घडली. याबाबत गुरुवारी (दि. 26 सप्टेंबर) गुन्हा दाखल करण्यात आता आहे.

रेश्मा सुनील गायकवाड (वय 30, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पती सुनील गायकवाड, आई इंदुबाई भास्कर डोंगरे, भाऊ प्रशांत भास्कर डोंगरे, रमा राजू हाके, रोशनी किशोर सरवदे, राजू हाके, रेखा भालेराव, किशोर सरवदे, पंचशीला घनघाव, दीपक हरिभाऊ डोंगरे, राकेश उर्फ चैत्र घनघाव, अंगुली घनघाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलै रोजी फिर्यादी रेशमा कामावर जात होत्या. त्यावेळी त्यांच्या चार बहिणींनी मिळून त्यांना हाताने मारहाण केली. तर भाऊ प्रशांत याने कमरेच्या बेल्टने मारहाण केली. यामध्ये रेश्मा यांच्या हाताला, पायाला व पाठीवर इजा झाली, असे रेश्मा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच रेश्मा यांच्या आईने रेश्मा यांना दुस-या मुलाच्या गाडीवर बघितले असल्याचे त्यांचा पतीला सांगितले. यावरून पतीने देखील मारहाण केली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.