Pimpri : राज्यस्तरीय टेनिस बॉलर क्रिकेट स्पर्धेत बारा संघांचा सहभाग

महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजिस्ट असोसिएशन संघटनेतर्फे आयोजन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजिस्ट असोसिएशन (MSBIRIA) या संघटनेतर्फे आयोजित चौथी राज्यस्तरिय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नुकतीच पिंपरी चिंचवड येथे पार पडली. अतिशय उत्साहवर्धक वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यामधून आलेल्या एकूण बारा संघांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेचे उदघाटन संघटनेचे अध्यक्ष डॉ श्री प्रशांत ओकार यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेतील अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात पिंपरी-चिंचवडच्या “पीसीएमसी ब्लास्टर्स ” या संघाने कप्तान डॉ. कुणाल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विजेतेपद पटकावले तर, नवी मुंबई रायगड हा संघ उपविजेता ठरला.

पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे माजी रणजि क्रिकेटपटू केलास गट्टाणी यांच्या हस्ते पार पडला. पिंपरी-चिंचवड असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष सबनीस यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी संघटनेचे सदस्य आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2