BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : हक्काचे एकवीस टीएमसी पाणी मिळविणारच – डॉ. प्रा. तानाजी सावंत

भूम परांडा वाशी रहिवाशांचा स्नेहमेळावा संपन्न

एमपीसी न्यूज – मागील विधानसभा निवडणुकीत आमच्या नेत्याला भाजपने अभिमन्युसारखे चक्रव्यहमध्ये अडकविले होते. मात्र, या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना गाफिल राहणार नाही. वेळप्रसंगी महाराष्ट्रातील सर्व जागा लढवून ‘एकला चलो रे’चीही आमची तयारी आहे. उस्मानाबादमधील सहाही जागा शिवसेना जिंकेल. मागील पन्नास साठ वर्षात जाणता राजाने मराठवाड्याचे पाणी पळविले. आता आमच्या हक्काचे एकवीस टीएमसी पाणी मिळविणारच, असे प्रतिपादन जलसंधारणमंत्री डॉ. प्रा. तानाजी सांवत यांनी केले.

भूम परांडा वाशी येथील पिंपरी चिंचवड शहरातील रहिवाशांच्या वतीने रविवारी (दि. 21 जुलै) आकुर्डी येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जलसंधारण मंत्री डॉ. प्रा. तानाजी सावंत आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी भूम परांडा वाशी रहिवासी पिंपरी चिंचवड संघाचे अध्यक्ष युवराज कोकाटे व निमंत्रक चंद्रकांत सरडे, माजी खासदार गजानन बाबर, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, शिवसेना कामगार नेते इरफान सय्यद, भूम तालुका शिवसेना प्रमुख सुरेश कांबळे, पुणे मनपा शिवसेना गटनेते अशोक हरणावळ, रोमी संधू आदी उपस्थित होते.

  • खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, जलसंधारणमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी भूम परांडा वाशी तालुक्यात पाचशे किलोमीटर नाले, नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण सरकारच्या मदतीची वाट न पाहता स्वखर्चाने केले. आता उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना पोटा पाण्यासाठी पुण्या मुंबईत यावे लागणार नाही 19 वर्षे त्या भागातील पाटबंधारे मंत्री असताना तुम्हाला गाव सोडून येथे यावे लागले ही खेदाची बाब आहे. मी विधानसभेत आमदार असताना काम करणारे मंत्री पाहिले ते हवेतच होते 19 वर्षात साधे 19 टीएमसी पाणी अडवू शकले नाहीत. 135 बंधाऱ्यांना मंजुरी, 550 बंधा-यांचे जीआर काढून प्रक्रिया सुरू केली आहे. हे फक्त एक महिना दोन दिवसात सावंत यांनी करून दाखविले.

स्नेहमेळाव्याच्या आयोजनात दीपक गटकळ, कैलास कुदळे, सचिन शिंदे, भाऊ हरणावळ, सुजाता गजरमल, पप्पू वायसे, सुर्यकांत देशमुख, रामराजे सावंत, प्रवीण चव्हाण, अंकुश गायकवाड, प्रितम मेटे, पप्पू पाटोळे, दीपक कांबळे, शरद जाधव, निलेश चव्हाण, जयराम लांडगे, खंडू कोळी, माऊली जाधव, बालाजी महाजन, संतोष बाबर, विशाल जाधव, कुश कोकाटे, शहाजी कारकर, संतोष सुर्यवंशी आदींनी सहभाग घेतला आहे.

  • स्नेहमेळाव्यास भूम परांडा वाशी येथून पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक स्वागत युवराज कोकाटे यांनी केले. तर, आभार चंद्रकांत सरडे यांनी मानले.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3