Pimpri : एचए स्कूलच्या दोन खेळाडूंना थाई बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक

एमपीसी न्यूज – हैदराबाद येथे (Pimpri) झालेल्या राष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेच्या दोन खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळवले. या स्पर्धा 14 ते 17 सप्टेंबर या कालावधीत संपन्न झाल्या.

हैदराबाद मधील एलबी स्टेडियम मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत एच ए स्कूल प्राथमिक विभाग शाळेतील दहा खेळाडू सहभागी झाले होते. त्यात 30 किलो वजन गटामध्ये रिद्धी वाळुंज आणि 20 किलो वजन गटात दूर्वा माने या दोन खेळाडू विद्यार्थिनींनी सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या.

सुरज सकट, हर्षवर्धन गेजगे, सिद्धी वाळुंज, कार्तिक देशमुख, सोनेश्वर राऊत, सूचिस्मिता राऊत, पूर्वा माने या खेळाडूंनी दणदणीत विजय मिळवला. या खेळाडूंची एशियन स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Pune : दागिने खरेदीच्या बहाण्याने चोरले काऊन्टरवरील फॅन्सी मंगळसूत्र

आंतरराष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धा नेपाळ येथे होणार आहेत. भारताचे पहिले पॅरालिम्पिक पदक विजेते पद्मश्री पुरस्कार (Pimpri)  मुरलीकांत पेटकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, ज्येष्ठ शिक्षिका अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे, रफेल जॉन स्वामी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. सर्व खेळाडूंना खेळ शिक्षक किरण माने यांचे मार्गदर्शन लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.