Pimpri : चिंचवड, हिंजवडी परिसरातून दोन दुचाकी चोरल्या; अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड आणि हिंजवडी परिसरातून दुचाकी चोरीस गेल्या आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 9) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाहन चोरीची पहिली घटना महात्मा फुले नगर, चिंचवड येथे 4 मार्च रोजी रात्री साडेअकरा ते 5 मार्च रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली.वैभव शरद गवळी (वय 26, रा. मृगनयन हौसिंग सोसायटी, महात्मा फुले नगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गवळी यांनी त्यांची एम एच 14 / एच एन 4346 ही दुचाकी सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

वाहन चोरीची दुसरी घटना 26 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ ते साडेअकरा वाजताच्या दरम्यान शनिमंदीर बस थांबा, ताथवडे येथे घडली. दत्तात्रय श्रावण खिलारे (वय 43, रा. जांबे, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खिलारे यांनी आपली एम एच 12 / बी सी 6281 ही दुचाकी शनिमंदीर बस थांबा, ताथवडे येथे रात्री साडेनऊ ते साडेअकरा वाजताच्या दरम्यान पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.