Pimpri: भोसरी, पिंपरीत वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – वाहनाच्या धडकेत भोसरी आणि पिंपरीत दोघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भोसरी आणि पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरीत घडलेल्या घटनेत शामराव विठ्ठलराव बिरादार (वय 42, रा. रोशल गार्डनजवळ, भोसरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार अशोक विनायक पवार यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बिरादार हे 20 मे रोजी भोसरीतील रोशल उद्यानाजवळून पायी जात होते. भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

  • तर, पिंपरीतील घटनेत यशवंत बाबू पेटेकर (वय-58, रा. पंचशिल हॉटेलच्या मागे, इंदिरानगर, चिंचवड) असे बुलोरो मोटारीच्या धडकेत ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा पुतण्या लक्ष्मण अशोक पेटेकर (वय-26) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पेटेकर रविवारी दुपारी सव्वा अकराच्या सुमारास पिंपरीतील पंचशील हॉटेलच्या पाठीमागील रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी अज्ञात बुलोरो मोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पेटेकर यांचा मृत्यू झाला. भोसरी, पिंपरी पोलिस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.