Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात आगीच्या दोन घटना

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (दि. 23) आगीच्या दोन घटना घडल्या. पहिली घटना पहाटे साडेचार वाजता लांडे वस्ती, कासारवाडी येथे घडली. या घटनेत झोपडपट्टीला आग लागली होती. तर दुसरी घटना दुपारी पावणे चार वाजता गणेश व्हिजन आकुर्डी येथे घडली. या घटनेत महापालिकेचे एक स्वच्छतागृह जळून खाक झाले.

सोमवारी पहाटे साडेचार वाजता मच्छीन्द्र लांडे यांनी लांडे वस्ती कासारवाडी येथे झोपडपट्टीला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. त्यानुसार जनरल अरुण कुमार वैद्य अग्निशमन केंद्राचे चालक प्रतीक राऊत, फायरमन प्रतीक कांबळी, मुकेश बर्वे, प्रशिक्षणार्थी उपास्थानक अधिकारी अभिजीत घार्गे, अक्षय गायकवाड, अंकुश परब, न्यानेश्वर बडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, आगीने रौद्र रूप धारण केल्याने मदतीसाठी आणखी बंब मागवण्यात आले. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्र, रहाटणी आणि भोसरी उपकेंद्राचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. एकूण चार बंबांच्या मदतीने आग विझविण्यात आली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

आगीची दुसरी घटना दुपारी पावणेचार वाजता घडली. गणेश व्हिजन आकुर्डी येथील शौचालयाला आग लागल्याची माहिती स्थानिक नागरिक ईमान शेख यांनी दिली. प्राधिकरण उपकेंद्राचे सब ॲाफीसर सुर्यकांत मठपती, वाहन चालक पदमाकर बोरावके, लिडिंग फायरमन भाऊसाहेब धराडे, फायरमन शंकर पाटील, विष्णु चव्हाण, प्राशिणार्थी विजय इंगळे आदींनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.