Pimpri: खासगी रुग्णालयांचे बेड व्यवस्थापन, बिलांची तपासणीसाठी दोन ‘आयआरएस’ अधिकाऱ्यांची नियुक्ती

Pimpri: Two IRS officers appointed to manage private hospital beds and check bills खासगी रुग्णालयात मोठ्या रकमांची बिले आकारली जात असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांलयाकरिताच्या बेडचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होते की नाही. त्यांची बिले व्यवस्थित होतात का, त्याची तपासणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने एन. अशोक बाबू आणि रवींद्र चव्हाण या दोन आयआरएस अधिका-यांची नियुक्ती केली आहे. आजपासून ते काम करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरु आहे. शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरातील रुग्णसंख्या 18 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. महापालिकेच्या वायसीएम, भोसरीतील रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे खासगी रुग्णालयात देखील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. खासगी रुग्णालयात मोठ्या रकमांची बिले आकारली जात असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत.

खासगी रुग्णालयाचे बिल तपासले जातील. सरकारच्या नियमानुसार उपचारांचे दर आकारणी केली आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालयांच्या बिलांची तपासणी स्वतंत्र अधिका-यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यासाठी विभागीय कार्यालयाने आरआरएस अधिकारी एन.अशोक बाबू आणि रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती केली आहे.

याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी हॉस्पिटलचे बेड व्यवस्थापन योग्य पद्धतीने होते की नाही. त्यांची बिले व्यवस्थित होतात का, त्याची तपासणी करण्यासाठी या दोन अधिका-यांची नियुक्ती केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने पिंपरी-चिंचवड शहरासाठी हे अधिकारी दिले आहेत. आजपासून ते काम करतील”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.