Pimpri: कोरोनाच्या लढ्यासाठी ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे दोन लाखांचा निधी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस  वाढत आहे. या संकटाविरूध्द लढण्यासाठी आणि कोरोनाग्रस्ताच्या मदतीसाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाद्वारे महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे ब्रह्माकुमारी वर्षा दिदी यांनी दोन लाखांचा धनादेश नुकताच सुपूर्द केला.

ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे सेवाकेंद्राच्या परिसरातील लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या, हातावर पोट असलेल्या नागरीकांना मदत म्हणून वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, एपीआय हरीष माने यांच्या निगराणीमध्ये सुरक्षित अंतर ठेवून जीवनावश्यक वस्तूंचे व अन्न धान्याचे वितरण करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

ब्रह्मा कुमारी वर्षा दीदी म्हणाल्या, ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे सामाजिक भावनेच्या बांधिलकीतून वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबविले जातात. तणावमुक्त जीवना करिता आमच्या अनेक शाखांद्वारे ऑनलाईन मेडिटेशन कोर्स विनामूल्य सुरू आहेत.

लॉकडाऊनच्या युवकांनी काळात थोर महात्म्यांची चरित्र, प्रेरणा देणारे पुस्तके वाचून वेळेचा सदुपयोग करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.