Pimpri : घरातून मोबाईल फोन चोरणा-या दोन चोरांना अटक

सहा गुन्ह्यांची उकल; गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

एमपीसी न्यूज – देहुरोड आणि चिखली परिसरात उघड्या घरातून तसेच घरफोडी करून मोबाईल चोरी करणाऱ्या दोन सराईतांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली.

योगेश रमेश देवकुळे (वय 19, रा.पाटीलनगर, चिखली), अभिषेक उर्फ सापू करमसिंग भूंभक (वय 20, रा. मेन बाजार, देहुरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस नाईक फारुक मुल्ला व नितीन बहिरट हे देहुरोड पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना दोन मुले मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी देहुरोड येथील शितळानगर येथे सापळा रचून देवकुळे व करमसिंग या दोघांना ताब्यात घेतले. दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ महागड्या कंपन्याचे 6 मोबाईल फोन मिळाले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरवातील उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलीस खाक्‍या दाखवताच त्यांनी हे मोबाईल चिखली व देहूरोड परिसरातून चोरल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून पोलिसांनी 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच त्यांच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात चार तर चिखली येथे दोन गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, पोलीस अप्पर आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, तसेच पोलीस कर्मचारी संपत निकम, धर्मराज आवटे, संजय गवारे, प्रवीण दळे, फारुक मुल्ला, मयूर वाडकर, नितीन बहिरट, जमीर तांबोळी, संदीप ठाकरे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.