Pimpri : पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 28) रात्री अकराच्या सुमारास वैभव नगर पिंपरी येथे करण्यात आली.

राम गोवर्धन बजाज (वय 44, रा. वैभव नगर, पिंपरी), गोविंद प्रभूदास ललवाणी (वय 41, रा. वैष्णव देवी मंदिराजवळ, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया या क्रिकेट मॅचवर बेकायदेशीरपणे संत कंवर राम पार्क, वैभव नगर येथील बजाज याच्या घरी बेटिंग घेत होते. पिंपरी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच घटनास्थळावर छापा मारून दोघांना ताब्यात घराण्यात आले. तसेच एलईडी टीव्ही, 16 मोबाईल फोन यासह अन्य 2 लाख 23 हजार 716 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. आरोपींवर मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.