Pimpri: दोन लाख 32 हजार मालमत्तांच्या करात अडीचपटीने वाढ; करवाढीला विरोधकांसह नागरिकांचा तीव्र विरोध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 2007 पुर्वीच्या सर्व मालमत्तांच्या करात अडीचपटीने वाढ केली जाणार आहे. शहरात 2007 पुर्वीच्या तब्बल दोन लाख 32 हजार मालमत्ता आहेत. या मालमत्तांच्या करात एकाचवेळी अडीचपटीने करवाढ केली जाणार आहे. या करवाढीला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. शहरात कोणत्याही सुविधा नसताना जुन्या नागरिकांनी घरे बांधली होती. त्यांना आता एकाचवेळी अडीचपटीने करवाढ करणे चुकीचे आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आजमितीला 5 लाख 25 हजार मिळकती आहेत. त्यापैकी 2007 पुर्वीच्या दोन लाख 32 हजार मालमत्ता आहेत. त्यामध्ये निवासी एक लाख 89 हजार, बिगरनिवासी 26 हजार, मिश्र 8 हजार 500, औद्योगिक चार हजार आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्तांना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते. जुन्या आणि नवीन मालमत्तांच्या करामध्ये मोठी तफावत आहे.

त्यात सुसुत्रता आणण्याचे सांगत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अर्थसंकल्पात शहरातील 2007 पुर्वीच्या दोन लाख 32 हजार मालमत्तांच्या करात तब्बल अडीचपटीने वाढ सुचविली आहे. तसेच महासभेने करवाढ फेटाळली. तर, करवाढ करण्याचे आपल्याला अधिकार असल्याचे सांगत करवाढ करण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे जुन्या मालमत्तांच्या करात मोठी वाढ होणार आहे. एकाचवेळी एवढी मोठी करवाढ सुचविल्याने जुन्या मालमत्ताधारकांमध्ये नाराजी भावना आहे.

या करवाढीला विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी विरोध दर्शविली आहे. शहरातील 15 वर्षापुर्वीच्या मालमत्ताकरात वाढ करणे चुकीचे आहे. अडीचपटीने वाढ करुन नागरिकांवार बुर्दड दिला जात आहे. करवाढीला आमचा विरोध आहेत. तर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी देखील करवाढीला विरोध केला आहे. महासभेने करवाढ फेटाळावी. तसेच महासभेने जरी फेटाळली, तरी मी माझ्या अधिकारात ही करवाढ लागू करेल. आयुक्तांच्या या मनमानीपणाचा तीव्र निषेध साठे यांनी केला आहे. करवाढ लागू केल्यास मालमत्ताधारक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेचे 2020-21 या आर्थिक वर्षाचा सोमवारी अर्थसंकल्प सादर केला. तसेच महासभेने करवाढ फेटाळली. तर, करवाढ करण्याचे आपल्याला अधिकार असल्याचे सांगत करवाढ करण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे 1 एप्रिलपासून करामध्ये तब्बल अडीचपटीने वाढ केली जाणार असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्याला नागरिकांचा विरोध वाढू लागला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.