Pimpri: ‘कॅप जेमिनी’कडून पालिकेस दोन हजार पीपीई किट्स, मास्क

Pimpri: Two thousand PPE kits, masks from Cap Gemini to pcmc शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध साहित्याची आवश्यकता पडत आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीकोनातून कॅप जेमिनी टेक्नॉलॉजिक लिमिटेड कंपनीने पालिकेस दोन हजार पीपीई किट्स, 500 नग के एन 95 मास्क, दोन हजार नग कवच मास्क आणि 50 लीटर सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले.

कंपनीचे केंद्र प्रमुख मनीष मेहता यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे हे साहित्य सुपुर्द केले. यावेळी सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कंपनीचे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक अमित मुढाळे उपस्थित होते.

दरम्यान, शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध साहित्याची आवश्यकता पडत आहे. पालिकेला शहरातील विविध कंपन्यांकडून सीएसआर फंडातून मदत केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.