Pimpri: रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या महिलेला दुचाकीची धडक; महिला गंभीर जखमी

Pimpri: Two-wheeler hit by a woman parked on the side of the road; The woman was seriously injured जखमी नुरी खान आणि त्यांचे पती लियाकत खान असे दोघेजण चिंचवड येथील महावीर चौकाजवळ असलेल्या दगडी वस्तू बनवून देणा-या विक्रेत्याकडे जाऊन दगडी वस्तू पाहत होते.

एमपीसी न्यूज- रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या महिलेला भरधाव आलेल्या एका दुचाकीने धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात 14 जून रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास चिंचवड येथील महावीर चौकाजवळ घडली.

नुरी लियाकत खान (वय 34, रा. हसन पापा चाळ, विठ्ठलवाडी, आकुर्डी) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी जखमी महिलेचे पती लियाकत अली खान (वय 39) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी नुरी खान आणि त्यांचे पती लियाकत खान असे दोघेजण चिंचवड येथील महावीर चौकाजवळ असलेल्या दगडी वस्तू बनवून देणा-या विक्रेत्याकडे जाऊन दगडी वस्तू पाहत होते.

त्यावेळी एक दुचाकीस्वार भरधाव आला. त्याने नुरी यांना जोरात धडक दिली. यामध्ये नुरी यांच्या डाव्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले. अपघाताची माहिती न देता आरोपी दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.