Pimpri : ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 19) सकाळी पिंपरीगाव येथे घडली.

विलास बबन नाणेकर (वय 55, रा. पिंपरीगाव) असे मृत्यू दुचाकीस्वाराने नाव आहे. याप्रकरणी समीर दिलीप नाणेकर (वय 28) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार परशुराम पांडुरंग राठोड (वय 37, रा. बौध्दनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विलास सोमवारी सकाळी त्यांच्या मोपेड दुचाकीवरून (एमएच 14 / जी 0275) जात होते. पिंपरी गावातील माउली न्यूज पेपर एजन्सीसमोर आले असता वेगात आलेल्या ट्रॅक्टरने (केए 33 / टीए 7726) धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या विलास यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.