Pimpri : कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

हा अपघात 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अजमेरा, पिंपरी येथे घडला. : Two-wheeler seriously injured in car crash

एमपीसी न्यूज – भरधाव रने मोपेड दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अजमेरा, पिंपरी येथे घडला. याबाबत 11 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आलोक प्रदीप भारशंकर (वय 35, रा. अजमेरा, पिंपरी) असे जखमी दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मोठा भाऊ आशिष प्रदीप भारशंकर (वय 37) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राहुल बनसोडे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्यांची कार (एमएच 14 / जीएच 2151) हयगयीने, निष्काळजीपणे चालवून आलोक यांच्या मोपेड दुचाकीला (एम एच 14 / जीएम 9792) जोरात धडक दिली. हा अपघात अजमेरा पिंपरी येथील मनीष गार्डन सोसायटीजवळ घडला.

यामध्ये आलोक गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचे देखील मोठ्या प्रकरणात नुकसान झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.