Pimpri : ऐतिहासिक विजयानिमित्त श्रीरंग बारणे यांचे उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील ऐतिहासिक विजयानिमित्त खासदार श्रीरंग बारणे यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. तसेच बारणे यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बारणे यांनी पवार कुटुंबातील सदस्याचा पहिल्यांदाच पराभव करुन इतिहास केला आहे.

निवडून आल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) मुंबईतील मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बारणे यांचे औक्षण केले. उद्धव ठाकरे यांनी बारणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बारणे या निवडणुकीत जाइंट किलर ठरले असून त्यांच्या निवडीमुळे मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेची प्रचंड ताकद वाढली आहे.

  • यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक रविंद्र मिर्लेकर, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, आमदार मनोहरशेठ भोईर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, तालुका प्रमुख राजु खांडभोर, शहर प्रमुख योगेश बाबर, नगरसेवक प्रमोद कुटे आदी उपस्थित होते.

पवार घराण्यातील उमेदवार असल्याने मावळच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढवित असल्याने या निवडणुकीला विषेश महत्व प्राप्त झाले होते. खास करून मिडीयाने देखील या मतदारसंघातील निवडणुकीस अधिक प्रसिद्धी दिली होती. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ यांचा दारुण पराभव केला. बारणे यांनी तब्बल सव्वा दोन लाखाच्या फरकाने निवडणूक येत इतिहास घडविला.

  • पवार घराण्यातील कुटुंबाचा पहिल्यांदाच पराभव केल्याने बारणे राज्यभरात चर्चेत आला आहेत. राज्यातील दिग्गज राजकारणी असलेल्या पवार घराण्याचा दोन लाख पंधरा हजार मतांनी पराभव केल्याने खासदार श्रीरंग बारणे यांना विषेश महत्व प्राप्त झाले असून शिवसेनेमध्ये त्यांचे वजन वाढले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.