Pimpri : UIDAI च्या नावाने क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये असला तरीही घाबरू नका !

एमपीसी न्यूज- सगळ्या सोशल मीडियावर सध्या अनेकांच्या अँड्रॉइड फोनमध्ये UIDAI च्या नावाने क्रमांक सेव्ह असल्यास तो डिलीट करून टाका असा मेसेज फिरत आहे. हा व्हायरस किंवा सायबर अटॅक असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र ही एक तांत्रिक चूक असून गुगलने गुगलनेच चुकीने हा क्रमांक घालून दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

2014 मध्ये भारतीय ग्राहकांसाठी अँड्रॉइड ओएस बनवताना गुगलने नजरचुकीने UIDAI च्या नावाने हा क्रमांक त्यात आधीच सेव्ह करून दिला. त्यामुळे हा क्रमांक आपल्या आपोआपच आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह झालेला दिसतो. ही चूक लक्षात येताच गुगल ने नंतरच्या व्हर्जन मधून ती दुरुस्त केली व तो क्रमांक काढून टाकला. त्यामुळे ज्यांची मोबाईल ओएस 2014 साली तयार झाली होती त्यांच्या संपर्क यादीत हा क्रमांक दिसतोय अन त्याच लोकांच्या इतर मोबाईल हा क्रमांक सिंक (sync) होऊन इतर ठिकाणी देखील दिसतो.

त्यामुळे तुमच्या मोबाईल मध्ये दिसणारा क्रमांक म्हणजे कुठलाही व्हायरस अथवा सायबर हल्ला नसून गुगल कंपनीच्या चुकीने आला आहे. तो तुम्ही डिलीट करून टाकू शकता असे गुगलनेच स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.