Pimpri: उल्हास जगताप यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार; महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांना सहाय्यक आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त आयुक्त (दोन) चा पदभार देखील त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबतच्या सदस्य प्रस्तावाला आज (गुरुवारी) झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 39 -ए मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण करणे आणि ही पदे भरण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. या निर्णयानुसार पिंपरी पालिकेत आस्थापनेवर अतिरिक्त आयुक्तांची शासन प्रतिनियुक्तीवरील एक आणि महापालिका अधिका-यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे दोन पदे निर्माण करण्यात आली आहेत.

  • महापालिकेच्या कामकाजाच्या दृष्टीने महापालिकेतील अतिरिक्त आयुक्ताचा पदभार सहआयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. नियमित वयोमानानुसार दिलीप गावडे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त (दोन) हे पद रिक्त झाले आहे. आज झालेल्या महासभेत नगरसचिव उल्हास जगताप यांना सहाय्यक आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त (दोन)चा पदभार सोपविण्यात मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.