Pimpri : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उल्हास शेट्टी यांचे जात प्रमाणपत्र अवैध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक उल्हास शेट्टी यांचे ‘कुणबी’ जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. या प्रकरणी माजी खासदार गजानन बाबर यांनी तक्रार दिली होती.

कर्नाटकातील बंट (अनुसूचित जाती) जातीचा दावा करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक जगदीश आणि उल्हास शेट्टी निवडून आले होते. त्यानंतर जगदीश शेट्टी यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले. उल्हास शेट्टी यांच्या विरोधातील दावा प्रलंबित होता. त्याचा निकाल 31 डिसेंबर 2018 मध्ये लागला.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रमोद यादव, सदस्य सचिव हि. शां. गाढे आणि सदस्य वासुदेव पाटील यांनी उल्हास शेट्टी यांनी सादर केलेले बंट जातीचा प्रमाणपत्र अवैध ठरविल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शेट्टी बंधूना मोठी धक्का बसला आहे. शेट्टी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे समर्थक आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.