_MPC_DIR_MPU_III

Pimpri: भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी उमा खापरे; भाजप प्रदेश सचिवपदी अमित गोरखे

Uma Khapre as BJP Mahila Morcha state president; Amit Gorkhe as Secretary विधी विभागाची जबाबदारी ॲड. सचिन पटवर्धन यांच्याकडे

एमपीसी न्यूज – भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे यांची नियुक्ती झाली आहे. तर, भाजप प्रदेश सचिवपदी युवा कार्यकर्ते अमित गोरखे यांची निवड झाली आहे. विधी विभागाची जबाबदारी ॲड. सचिन पटवर्धन यांच्याकडे सोपविली आहे. तर, प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी खासदार अमर साबळे आणि प्रदेश कार्यसमिती निमंत्रित सदस्य म्हणून एकनाथ पवार, सदाशिव खाडे, राजेश पिल्ले यांची वर्णी लागली आहे. भाजपने कार्यकारिणीत शहरातील जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज (शुक्रवारी) प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या पदाधिकाऱ्यांमध्ये 12 प्रदेश उपाध्यक्ष, 6 प्रदेश सरचिटणीस व 12 चिटणीस यांचा समावेश आहे. त्या शिवाय सात मोर्चा आणि 18 विविध प्रकोष्ठाची नियुक्तीही आज जाहीर करण्यात आली.

भाजपच्या कार्यकारिणीत पिंपरी-चिंचवड शहराला झुकते माप दिले आहे. भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी उमा खापरे यांची नियुक्ती झाली आहे. खापरे यांनी महिला मोर्चा प्रदेश सचिवपदासाह संघटनेतील विविध महत्वाची पदे भूषविली आहेत.

_MPC_DIR_MPU_II

त्या जुन्या कार्यकर्त्या असून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे समर्थक अशी त्यांची ओळख आहे. 2001-02 मध्ये खापरे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या. दोन टर्म नगरसेविका म्हणून त्यांना कामकाज केले आहे.

तर, सचिवपदी वर्णी लागलेले अमित गोरखे यापूर्वी प्रदेश कार्यकारिणी सदस्य होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून म्हणून ते ओळखले जातात. गोरखे यांनी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडाळाचे अध्यक्षपद (राज्यमंत्री दर्जा) देखील भूषविले आहे. आता त्यांची प्रदेश सचिव (मंत्री) पदी नियुक्ती झाली आहे.

तर, राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष असलेल्या ॲड. सचिन पटवर्धन यांच्याकडे विधी विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय अशी पटवर्धन यांची ओळख आहे.

प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांची वर्णी लागली आहे. तर, प्रदेश कार्यसमिती निमंत्रित सदस्य म्हणून माजी सभागृह नेते , नगरसेवक एकनाथ पवार, पीसीएनटीडीएचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक राजेश पिल्ले यांची नियुक्ती झाली आहे. भाजपने कार्यकारिणीत शहरातील जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.