Pimpri : छत्री, रेनकोट, प्लास्टिक शीट्स, कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश

एमपीसी न्यूज – येणारा पावसाळा लक्षात घेता राज्य सरकारने छत्री, रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स, कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश केला आहे.

राज्यात लॉकडाऊनच्या काळात करावयाच्या उपायांच्या  संदर्भात आज (शुक्रवारी) शासनामार्फत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली. त्यानुसार येणारा पावसाळा लक्षात घेऊन छत्री, रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स किंवा कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश केला आहे.

दरम्यान, हा आदेश 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लागू राहील. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक 2  मे 2020 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर करण्यात आलेल्या लाॅकडाऊन मध्ये  शिधा, गॅस आणि इतर गोष्टींचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये केला होता. येणारा पावसाळा लक्षात घेऊन सरकारने आता सुधारित निर्णय काढून रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स, कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.