Pimpri: सीएसआरअंतर्गत क्रेडाई संस्थेने पालिकेला दिले 12 आयसीयु बेडस्

Under CSR, Credai provided 12 ICU beds to the municipality

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका उपाय योजना सुरु असताना बांधकाम व्यवसायिकांच्या क्रेडाई या संस्थेने सी.एस.आर. अंतर्गत जिजामाता रुग्णालयास 12 आय.सी.यु. बेडस् तातडीने सुपुर्द केले आणि सामाजिक बांधिलकी जोपासली. यापुढेही संस्थेने असेच सहकार्य करावे, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले. तसेच संस्थेच्या या कार्यबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, जिजामाता रुग्णालयाचे काम प्रशासनाने युद्ध पातळीवर पुर्ण आय.सी.यु. वॉर्डची उभारणी केली आहे. त्यामुळे वाय.सी.एम. रुग्णालयाचा ताण कमी होण्यास मदत होईल.

सद्यस्थितीत कोरोनाच प्रादुर्भाव शहरात वाढत असून नागरीकांनी मास्क लावणे गरजेचे आहे. विनाकारण नागरीकांनी रस्त्यावर फिरु नये, अनावश्यक गर्दी टाळावी. याकरीता त्यांनी आयुक्तांना कडक उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, राज्यात कोरोनाची सुरुवात झाली त्यावेळी पिंपरी चिंचवड शहर नंबर एक वर होते. शहरात वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे प्रशासन अत्यावश्यक सेवासुविधा उभारण्यासाठी युद्ध पातळीवर काम करीत होते.

त्याचेच फलित म्हणून भोसरीत नवीन 120 बेडचे व पिंपरीतील 100 बेडचे जिजामाता रुग्णालय पूर्ण करण्यात आले. जिजामाता रुग्णालयात आयसीयू वॉर्डसाठी आवश्यक असणारे साहित्य देण्यासाठी क्रेडाई मेट्रो पुणे संस्थेने मदत केली. याबद्दल शहरातील नागरिक व प्रशासनाच्या वतीने आयुक्त हर्डीकर यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी बोलताना क्रेडाईचे सुहास मर्चंट यांनी त्यांच्या उपक्रमाविषयी माहिती दिली. शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता संस्थेने निर्णय घेतला की नव्याने बांधकाम झालेल्या जिजामाता रुग्णालयात आय.सी.यु.ची आवश्यकता भासू शकते, त्या अनुषंगाने १२ अद्यावत आय.सी.यु. बेड सुपुर्त करावेत आणि त्यानुसार आज महापालिकेस हस्तांतरण करण्यात आलेले आहे.

यासाठी सुमारे ५६ लाख इतका खर्च आलेला आहे. संस्थेने गेल्या तीन महिण्यात विविध ठिकाणी पी.पी.ई.किट, धान्य वाटप, आयु.सी.यु. बेड वाटप, सॅनिटायझर आदी वाटप केलेले आहे. असे सांगून यापुढेही संस्था सामाजिक बांधिलकीतून अशा प्रकारचे समाजकार्य करणार असल्याचे सांगितले.

पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात झालेल्या या आय.सी.यु. बेड हस्तांतरण कार्यक्रमाला उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभाग अध्यक्षा अर्चना बारणे, नगरसदस्य हिरानंद ऊर्फ डब्बू आसवाणी, संदिप वाघेरे, नगरसदस्या उषा वाघेरे,निकीता कदम, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, जिजामाता रुग्णालय प्रमुख डॉ. संगिता तिरुमणी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, स्मिता झगडे, क्रेडाई संस्थेचे पदाधिकारी सुहास मर्चंट, अनिल फरांदे, संतोष कर्नावट, आय.पी. इनामदार, डॉ. दिवाकर अभ्यंकर, विनोद चांदवानी, सतीश आगरवाल, समीर पारखी आदि उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.