Pimpri: अनलॉक -3, शॉपिंग मॉल सुरू होणार; दुचाकीवरून डबलसीट प्रवास करता येणार

Unlock-3, shopping mall to start; Doubleseat travel is possible by bike : शहरातील सर्व दुकाने 9 ते 7 वाजेपर्यंत सुरु राहणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात उद्यापासून अनलॉक -3ची अंमलबजावणी सुरू होणार आहे. शहरातील सर्व दुकाने 9 ते 7 या वेळेत सुरु राहणार आहेत. तर, शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स 5 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत. हॉटेलमधील निवास व्यवस्था 33 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. दुचाकीवरून डबलसीट प्रवास करता येणार आहे.

याबाबतची नियमावली आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (शुक्रवारी) जारी केली आहे.

राज्यात उद्यापासून अनलॉक -3 चा टप्पा सुरू होणार आहे. त्याबाबतची नियमावली महापालिकेने जारी केली आहे. यामध्ये दुकानांची वेळ दोन तासाने वाढविण्यात आली आहे.

हे सुरू राहणार !

#सर्व  दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरु राहणार तर बाजारपेठेतील दुकाने पी 1, पी 2 नुसार सुरू राहतील.

#शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स 5 ऑगस्ट पासून सुरू होणार.

#  हॉटेल, लॉजिंग, गेस्ट हाऊस निवास व्यवस्थेसाठी 33 टक्के क्षमतेने सुरू.

# शासकीय कार्यालये 15 टक्के मनुष्यबळासह सुरू.

# क्रीडा संकुले, स्टेडियम, पालिकेची मैदाने, उद्याने  सकाळी 6 ते सायंकाळी 7 पर्यंत खुली राहणार.

#औद्योगिक आस्थापना 100 टक्के क्षमतेने सुरु.

#खासगी कार्यालये, माहिती तंत्रज्ञान विषयक 50 टक्के मनुष्यबळासह सुरु, शक्य असेल तोपर्यंत वर्क फ्रॉम होम.

#सरकारच्या आदेशानुसार केशकर्तनालये, ब्युटी पार्लर सुरु राहणार.

हे असणार बंद

#शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था.

#रेस्टारंट, सिनेमा हॉल,  व्यायाम शाळा, जलतरण तलाव, बार, सभागृहे, नाट्यगृहे, मनोरंजन पार्क.

#सर्व प्रकारचे सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजने, सांस्कृतीक, शैक्षणिक उपक्रम, सभा, संमेलने.

#सर्व धार्मिक स्थळे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.