Pimpri : उन्मुक्त युवा संगठनतर्फे ‘ई-कचरा’बाबत सफाई कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – कचऱ्याचे विलगीकरण तसेच ‘ई-कचरा’ या विषयांवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सफाई कर्मचार्यांना उन्मुक्त युवा संगठन तर्फे बुधवारी (दि.19) मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये घरच्याघरी सोप्या पद्धतीने कंपोस्ट खत बनवण्याबद्दल ज्ञान अवगत करून देण्यात आले. तसेच कचरा ही महापालिकेची नाही तर प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे, असे मत आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी व्यक्त केले. गोफणे पुढे म्हणाले, लवकरच महापालिकेकडून कचरा वेगवेगळा घेतला जाणार आहे.

याप्रसंगी घटनेच्या बोधचिन्हाचे आनावरण करण्यात आले तसेच सफाई कर्मचाऱ्यांना झाडांची रोपे देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रसिद्ध लेखक आणि ‘लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड’चे खजिनदार दिगंबर ढोकले, आरोग्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गोफणे, शिवलिंग ढवळेश्र्वर, ऋषीकेश तपशाळकर व इतर मान्यवर आणि मोठया प्रमाणावर नागरीक आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.