MPC News Impact: अत्यवस्थ कोरोना रुग्णाला मिळाला कोरोनामुक्त झालेल्या रक्ददात्याकडून प्लाझ्मा

Urgent need for corona-free A + blood for patients undergoing corona treatment in ICU; Donor appeal to come forward

एमपीसी न्यूज – वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोनाग्रस्त महिलेची प्रकृती गंभीर असून आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. महिलेवर प्लाझ्मा थेरपी करण्यासाठी कोरोना लागण होऊन 28 दिवस पूर्ण झालेल्या आणि ‘ए’ पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या रक्ताची तत्काळ आवश्यकता होती. रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या विनंतीनुसार ‘एमपीसी न्यूज’ने रक्तदात्यांना आवाहन करणारे वृत्त प्रसारित केले. त्याला प्रतिसाद देत अनेक रक्तदात्यांनी रुग्णालयाशी संपर्क साधला व रुग्णासाठी आवश्यक असणारे रक्त उपलब्ध झाले. 

या मदतीसाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी, संबंधित बातमी सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या सर्व संवेदनशील नेटीझन्सना, आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या सर्व रक्तदात्यांना, प्रत्यक्ष प्लाझ्मा दान करणाऱ्या दात्यांना तसेच हे आवाहन लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल ‘एमपीसी न्यूज’ला विशेष धन्यवाद दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.