Pimpri: पालिका प्रवेशद्वारावर कोरोना तपासणीकरीता दर्जेदार साहित्य वापरा – नाना काटे

Use quality materials for corona inspection at the municipal entrance - Nana Kate

एमपीसी न्यूज – वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालय प्रवेशव्दारावर कोरोनाबाबत  तपासणीकरीता दर्जेदार साहित्य वापरण्याची मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नाना काटे यांनी म्हटले आहे की, शहरामध्ये कोरोना संसर्गांचा प्रादुर्भाव दिवसोदिवस वाढतच चालला आहे. शहरात आज अखेर 2486 सकारात्मक कोरोना बाधित असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत. रोज तीनशे चारशेच्या पटीत कोरोनाबाधित सापडत आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाग्रस्तांची स्थिती गंभीर झालेली आहे.

जुलै-ऑगस्ट मध्ये सुध्दा कोरोना बाधित रुग्णांची संख्या  वाढणार आहे. मागील आठवड्यामध्ये पालिका मुख्यालयात कार्यरत असणा-या 10-12 कर्मचा-यांना सुध्दा कोरोनाची लागण झालेली आहे. वस्तुत: कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून म्हणजे मार्चपासूनच  कोरोना विषाणू संसर्गांच्या लक्षणांपैकी एक शरीराचे तापमान वाढते. त्यासाठी पालिका प्रवेशव्दारावर मुख्यालयामध्ये येणा-या कर्मचारी व इतर अभ्यागतावर थर्मल स्कनरव्दारे शरीरातील तापमान मोजणे चालू केले होते. तरी सुध्दा मनपा मुख्यालयातील 10-12  कर्मचा-यांना कोरोना संसर्ग झालेला आहे. याचा अर्थ मनपाच्या प्रवेशव्दारावरील थर्मल स्कनर तकलादू आहे.

बहुतेक कर्मचा-यांच्या शरीराचे तापमान एकसारखेच दाखवत आहे. त्यामुळे थर्मल स्कन रने जरी शरीराचे तापमान मोजले तरी ते अचूक मोजले जात नाही. त्यामुळेच मुख्यालयतील कर्मचा-यांचे कोरोनाबाबतचे निदान करता आले नाही. त्यामुळे मनपा मुख्यालयात काम करणारे कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत.

पालिकेच्या कर्मचा-यांनाच जर कोरोनाची लागण झाली. तर कोरोना विरुध्द लढण्यासाठी मनपाकडे  मनुष्यबळ उपलब्ध राहणार नाही. परीणामी, शहरात आरोग्याची बिकट अवस्था होऊ शकते. त्याचप्रमाणे मनपाच्या काही नगरसदस्यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे पालिका मुख्यालयाच्या प्रवेशव्दारावर अत्याधुनिक व दर्जेदार थर्मल स्कनर तसेच ऑक्सीमीटर वापरण्यात यावे. जेणे करुन मुख्यालयात येणा-या कर्मचा-यांचे शरीराचे तापमान व रक्तातील ऑक्सीजनची पातळी मोजण्यात येईल. संभाव्य कोरोनाबाधितांची अथवा अन्य आजाराची ओळख पटू शकेल. त्यामुळे मुख्यालयात कोरोनाचा प्रसार होणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.