Pimpri : मुलीच्या लसीकरणावेळेस पालक आयुक्त हजर

राधा श्रावण हर्डीकर हिने घेतली रुबेला आणि गोवर  लस

एमपीसी न्यूज – रुबेला आणि गोवर लस मोहीम शहरात जोरात सुरू आहे. निगडी येथील सिटी प्राईड स्कुलमधील विद्यार्थ्यांना रविवारी (दि.2) लस टोचविण्यात आली. राधा श्रावण हर्डीकर हिने देखील लस घेतली. यावेळी तिचे वडील आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आई अदिती हर्डीकर उपस्थित होते. 
रुबेला आणि गोवर  लस मोहीम शहरात जोरात सुरू आहे.  या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या वतीने 27 नोव्हेंबरपासून अंगणवाडी, बालवाडी, नर्सरी आणि शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जात आहे. नऊ महिने ते 15 वयापर्यंतच्या मुलांना लस देण्यात येत आहे. महिनाभर ही मोहीम सुरू राहणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची मुलगी राधा ही निगडी येथील सिटी प्राईड स्कुलमध्ये दुसरीच्या वर्गात शिकत आहे. मुलीच्या लसीकरणावेळी पालक आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आई अदिती हर्डीकर यांनी आवर्जून उपस्थित राहत मुलीला रुबेला आणि गोवर लस दिली.  यावेळी महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे उपस्थित होत्या.
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक पालकांनी आपल्या नऊ महिने ते 15 वयापर्यंतच्या मुलांना  रुबेला आणि गोवर ही मोफत लस घ्यावी, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.