Pimpri News : साप्ताहिक सुट्टी निमित्त रविवारी लसीकरण बंद

एमपीसी न्यूज – साप्ताहिक सुट्टीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद राहणार आहे.

देशभर 16 जानेवारी 2021 पासून 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. पिंपरी – चिंचवड शहरात महापालिकेच्या 69 केंद्रांवर आणि खासगी 132 केंद्रांवर लसीकरण केले जात असून लस उपलब्धतेनुसार थोड्या अधिक फरकाने लसीकरण केले जात आहे.

पिंपरी – चिंचवड शहरात शुक्रवार (दि. 24) पर्यंत 18 लाख 46 हजार 937 एवढे लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये तृतीयपंथी, गरोदर महिला यांना लसीकरणासाठी प्राथमिकता दिली जात आहे. गरोदर महिलांच्या लसीकरणासाठी शहरातील आठ केंद्रांवर काही डोस राखीव ठेवले जात आहेत.

तसेच विदेशात शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त जाणाऱ्यांचे देखील प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. पालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयात हे लसीकरण केले जात आहे. विदेशात जाणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे आणणे आवश्यक आहे.

दरम्यान, साप्ताहिक सुट्टीनिमित्त पिंपरी – चिंचवड शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.