Pimpri Vaccination News: शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना रविवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’ची लस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना 36 केंद्रांवर ‘कोविशिल्ड’चा पहिला तर 45 वर्षांपुढील नागरिकांना 28 केंद्रांवर ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस उद्या (रविवारी) मिळणार आहे. तर, 18 ते 44 या वयोगटातील आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना 4 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ”कोविशिल्ड’ चा पहिला डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, संजय काळे सभागृह, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, घरकुल दवाखाना चिखली, यमुनानगर रुग्णालय, रुपीनगर ठाकरे शाळा, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, नुतन शाळा ताम्हाणे वस्ती, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, नेहरुनगर उर्दु शाळा, महापालिका शाळा खराळवाडी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, सखुबाई गार्डन भोसरी, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, आदिशक्ती हॉस्पिटल भोसरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, निळु फुले नाट्यगृह सांगवी, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, खिवंसरा हॉस्पिटल थेरगाव, पिंपळेनिलख इंगोले शाळा, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा,कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगाव, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, नवीन जिजामाता रुग्णालय, नताशा आय क्लिनिक पिंपळेसौदागर, काकाज इंटरनॅशनल स्कूल तापकिर मळा, काळेवाडी, फकीरभाई पानसरे उर्दु शाळा चिंचवड, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, सेक्टर नंबर 29, आठवडा बाजाराजवळ रावेत, अश्विनी मेडिकल फाऊंडेशन मोरया हॉस्पिटल चिंचवड आणि प्रेमलोक पार्क दवाखाना या 36 केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 200 च्या क्षमतेने लस मिळणार आहे.

कोविन ॲपवर नोंदणी करुन 100 टक्के ऑनलाईन स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. उद्या सकाळी 8 वाजल्यानंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येणार आहेत.

तर, ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी, एचसीडब्ल्यू आणि फ्रंट लाईन वर्कर यांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे. उद्या 28 केंद्रांवर कोविशिल्डचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !

हेडगेवार जलतरण तलाव, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, आरटीटीसी सेंटर, महापालिका कन्या शाळा चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, भानसे स्कुल यमुनानगर, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल जिजामाता पार्क फुलेनगर, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, क्वालिटी सर्कल भोसरी, नवीन भोसरी रुग्णालय, गंगोत्री पार्क दिघी, महापालिका शाळा बोपखेल, कासारवाडी दवाखाना, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, महापालिका शाळा वाकड, यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा रहाटणी, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, जुने तालेरा रुग्णालय, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दिला जाणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप या पद्धतीने हे लसीकरण करण्यात येणार आहे.

कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस ‘ या’ केंद्रांवर मिळणार !

18 ते 44 या वयोगटातील लाभार्थ्यांना नवीन जिजामाता रुग्णालय आणि फकीरभाई पानसरे उर्दु शाळा चिंचवड, येथे 100 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा, तर 45 वर्षांपुढील नागरिकांना सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी आणि पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा येथे ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

गरोदर महिलांना ‘या’ केंद्रांवर मिळणार लस !

सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.