Pimpri Vaccination News : 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी ‘अशी’ करावी नाव नोंदणी

उद्या लस घेण्यासाठी आज साडेसात वाजेपर्यंत करावी नोंदणी

0

एमपीसी न्यूज – 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. त्यासाठी महापालिकेने आठ केंद्रे सुरू केली आहेत. लसीकरणासाठी आदल्या दिवशी नावनोंदणी करून अँपॉइंटमेंट घ्यावी लागते.

या वयोगटातील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी आज सायंकाळी साडेसात पूर्वी www.cowin.gov.in/aarogya setu app वर पूर्व नोंदणी (register yourself) करावी. पूर्व नोंदणीनंतर सायंकाळी साडे सात वाजता उद्यासाठी अँपॉइंटमेंट घेण्याकरिता www.cowin.gov.in/aarogya setu app मध्ये schedule मध्ये क्लिक करून त्यानंतर schedule now वर click करावे.

त्यानंतर पिन कोड टाकावा व सर्च करावे. उद्याची तारीख व नमूद सेंटरच्या नावासमोर 200 इतकी संख्या दिसेल.

_MPC_DIR_MPU_II

200 या संख्येवर क्लिक करावे. कोणत्याही टाईम स्लॉटची निवड करावी आणि अँपॉइंटमेंट कन्फम करावी. अशा पध्दतीने अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर आपणास अपॉइंटमेंट शेड्युल झाल्याचा संदेश प्राप्त होईल.

याप्रमाणे अपॉइंटमेंट घेण्याकरिता महापालिकेच्या यमुनानगर रूग्णालय पिन कोड-411044, नेत्र रुग्णालय मासूळकर कॉलनी – 411018, पिंपळेनिलख येथील महापालिका शाळा – 411027, नवीन आकुर्डी रुग्णालय – 411035, अहिल्यादेवी होळकर शाळा सांगवी – 411027, प्रेमलोक पार्क दवाखाना – 411033, नवीन जिजामाता रुग्णालय – 411017 आणि नवीन भोसरी रुग्णालयासाठी पिन कोड- 411026 वापरावेत.

आठ लसीकरण केंद्राच्या ठिकाणची appointment book करून लसीकरणाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच appointment नसलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment