Pimpri Vaccination News: शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना शुक्रवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार लसीचा दुसरा डोस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील वयवर्षे 45 पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोव्हॅक्सीनचा’ दुसरा डोस उद्या (शुक्रवारी ) पूर्ण क्षमतेने लसीकरण सत्रे आयोजित करुन देण्यात येणार आहे. नऊ केंद्रांवर हे लसीकरण होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका लसीकरण केंद्रावर आज 6656 लाभार्थीना लसीकरण करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थीचे लसीकरण करण्यात येणार नाही. फक्त वय वर्षे 45 पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थीना ‘कोव्हॅक्सीनचा’ दुसरा डोस देण्याची कार्यवाही सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत होणार आहे.

महापालिकेच्या यमुनानगर रुग्णालय, तालेरा रुग्णालय, सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, नवीन जिजामाता रुग्णालय, आचार्य आत्रे सभागृह वायसीएम रुग्णालय जवळ, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन आकुर्डी रुग्णालय व आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी रुग्णालय जवळ या लसीकरण केंद्रावर करण्यात येणार आहे.

त्यामुळे वय वर्षे 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.