Pimpri Vaccination News : शहरातील नागरिकांना बुधवारी 62 केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’ची लस

 एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (बुधवारी) ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप,  ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

62 केंद्रांवर कोविन अ‍ॅपवरुन बुकिंग केलेले 5 लाभार्थी, किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेले 20 लाभार्थी आणि उर्वरित ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन पद्धतीने ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. तर, 9 केंद्रांवर कोव्हॅक्सिनचा डोस देण्यात येणार आहे.

स्तनदा माता, गरोदर महिलांना या केंद्रांवर मिळणार लस

सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय,  आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे स्तनदा माता, गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.