Pimpri Vaccination News : शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना गुरुवारी ‘कोविशिल्ड’ची लस ‘या’ केंद्रांवर मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (गुरूवारी) ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस मिळणार आहे. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या, ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या आणि कोविन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप नोंदणीद्वारे लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

18 ते 44 वयोगटातील ऑनलाईन, किऑस्कद्वारे नोंदणी केलेल्यांना या केंद्रांवर लस मिळणार!
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, कासारवाडी दवाखाना, जुने जिजामाता रुग्णालय आणि प्रेमलोक पार्क दवाखाना येथे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या 80 जणांना, कोविन अ‍ॅपवरुन बुकिंग केलेल्या 20 जणांना पहिला डोस देण्यात येणार आहे. तर, कोविन अ‍ॅपद्वारे बुकिंग केलेल्या 130 आणि किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या 20 लाभार्थ्यांना दुसरा डोस या केंद्रांवर देण्यात येणार आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांना पहिला डोस या केंद्रावर मिळणार!
हेडगेवार जलतरण तलाव, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, महापालिका शाळा जाधववाडी, रुपीनगर ठाकरे शाळा, नूतन शाळा ताम्हाणे वस्ती, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, नेहरुनगर उर्दु शाळा, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल,संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, सखुबाई गार्डन भोसरी, पिंपळेनिलख इंगोले शाळा,महापालिका शाळा वाकड, यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग, निळु फुले नाट्यगृह पिंपळेगुरव,शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, फकीरभाई पानसरे उर्दु शाळा चिंचवड आणि सेक्टर नंबर 29, आठवडा बाजाराजवळ रावेत या 20 केंद्रांवर कोविन अ‍ॅपवर नोंदणी करुन स्लॉट बुकिंग केलेल्या 20 आणि किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या 80 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. कोविन अ‍ॅपवर नोंदणीसाठी सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येतील.

तर, ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी, एचसीडब्ल्यू आणि फ्रंट लाईन वर्कर यांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे. कोविन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप नोंदणी, किऑस्क प्रणालीद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

45 वर्षापुढील नागरिकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन, किऑस्क प्रणालीद्वारे ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार!
संजय काळे सभागृह, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, आरटीटीसी सेंटर, घरकुल दवाखाना चिखली, महापालिका कन्या शाळा चिखली, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, भानसे स्कुल यमुनानगर, तळवडे समाज मंदिर शाळा, दिनदयाल शाळा पवना बँके मागे, संत तुकारामनगर, पिंपरी, महापालिका शाळा खराळवाडी, क्वालिटी सर्कल भोसरी, गंगोत्री पार्क दिघी, नवीन भोसरी रुग्णालय, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, महापालिका शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगाव, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा रहाटणी, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, जुने तालेरा रुग्णालय, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या 32 केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दिला जाणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, किऑस्क टोकन प्रणालीद्वारे हे लसीकरण करण्यात येणार आहे.

‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस या केंद्रांवर मिळणार!
सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे 18 ते 44 या वयोगटातील कोविन अ‍ॅपद्वारे ऑनलाइन बुकिंग केलेले, किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तर, 45 वर्षापुढील नागरिकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने नवीन भोसरी रुग्णालय, पिंपळेनिलख इंगोले महापालिका शाळा येथे ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

स्तनदा माता, गरोदर महिलांना या केंद्रांवर मिळणार लस!
सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.